मुंबईमध्ये परतू नये म्हणून संजय राऊत यांची धमकी कंगना रनौत चं ट्वीट
Kangana Ranaut and Sanjay Raut | Photo Credits: Facebook PTI

मुंबईमध्ये बॉलिवूड कलाकारांवर टीका आणि आरोपांच्या फैरी झाडणार्‍या कंगना रनौत (Kangana Ranaut) कडून आज शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहे. कंगना टीम या तिच्या ट्विटर अकाऊंटवरून संजय राऊत यांनी मला मुंबईमध्ये परत न येण्याची खुली धमकी आहे. मला मुंबई पाकव्याप्त कश्मीर असल्यासारखं का वाटत आहे? असा सवाल देखील तिनं ट्वीट मध्ये विचारला आहे. मात्र पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी  कोणाला महत्त्व किती द्यायचंय ते पाहावं लागेल. तसेच ड्रग्ज माफियांबद्दल काही पुरावे असतील तर पोलिसांना दयावेत असा सल्ला देखील दिला आहे. केवळ ट्वीटरवर गप्पा मारण्यात काही अर्थ नसतो म्हणतं धुडकावून लावलं आहे.

कंगना रनौत सध्या मागील काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर तिने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांवर टीका केली होती. नेपोटिझमचे आरोप देखील कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींवर लावले होते. करण जोहर आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याने त्याला सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अभय मिळत असल्याचेही वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.  Kangana Ranaut Wants A Drug Test: रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विक्की कौशल यांना कोकिनचे व्यसन? अफवांना पूर्णविराम देण्यासाठी कंगना रनौतची सर्वांना ड्रग्ज टेस्ट करण्याची विनंती.  

Kangana Tweet

कंगनाने काही दिवसांपूर्वी तिला मुव्ही माफिया पेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. मला हिमाचल सरकार किंवा केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी पण मुंबई पोलिसांनी नव्हे असं मत देखील ट्वीटर वर दिलं होतं.

दरम्यान आज मुंबईमध्ये संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळेस त्यांनी मंदिर उघडण्याबाबत ते अगदी राज्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत सरकारमधील भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं आहे.