कामोठे मध्ये दुहेरी हत्याकांड; कौटुंबिक वादात दिराने केली वहिनी आणि पुतण्याची निर्घृण हत्या
(संग्रहित प्रतिमा)

दिवसेंदिवस कौटुंबिक वाद हे चव्हाट्यावर येत असताना हे वाद आता एकमेकांच्या जीवावर बेतण्याइतपत थराला गेले आहेत. अशाच एका कौटुंबिक वादातून पनवेलमधील (Panvel) कामोठे (Kamothe) परिसरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, यात दिराने आपल्या वहिनी आणि पुतण्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येने कामोठे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी सुरेश दिनकर चव्हाण याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

कामोठेमध्ये सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटीत चव्हाण कुटूंब राहते. यात 22 वर्षीय जयश्री योगेश चव्हाण आपल्या 2 वर्षांच्या मुलासह राहत होत्या. या मुलाचे नाव अविनाश योगेश चव्हाण असे आहे. मंगळवारी पहाटे आरोपी सुरेशने आपल्या भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर या दोघांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.

हेही वाचा- मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या

या प्रकरणी मृत महिलेचा दिर तसेच आरोपी सुरेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली असून हत्येबाबत अधिक चौकशी करुन हत्येचे नेमकं कारण काय आहे याचा तपास घेत आहेत. हत्येच्या कटावरुन कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांना आहे.