Kalyan Traffic Police : वाहतूक पोलीस अनेकवेळा रस्त्यावर लावलेले वाहन टो (Tow Bike)करण्याची कारवाई करतात. त्यानंतर संबंधीत वाहन चालक आपले वाहन सोडवण्यासाठी दंड (Penalty) भरतो आणि वाहन घेऊन निघूण जातो. मात्र, कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांना त्यांच्या कारकीर्दीत घडली नसेल अशा एका वेगळ्या घटनेला समोर जावे लागले आहे. ज्याची चर्चा संपूर्ण कल्याणमध्ये होत आहे. कल्याणच्या खडकपाडा परिसरात एकाने त्याची दुचाकी नो पार्किंगमध्ये (No Parking) लावली होती. मग काय, वाहतून पोलिसांनी ती टो केली. हा प्रकार पाहून चालक संतापला. आधी त्याने वाहतूक पोलिसांना दुचाकी सोडून देण्याची विनवणी केली. मात्र, तरीही पोलीस ती दुचाकी सोडत नसल्याने, अखेर चालक टोईंग व्हॅनखाली जाऊन झोपला. जवळपास त्याने अर्धातास टोईंग व्हॅनखाली झोपत गोंधळ घातला. (हेही वाचा : Viral Video: पोलिस हवालदाराचा तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई ट्रफिक पोलिसाचं स्पष्टीकरण)
माझी दुचाकी रोलिंग व्हॅनवरून खाली उतरवणार नसाल तर माझ्या अंगावरून तुमची गाडी घेऊन जा, असं सांगत चालकाने अक्षरश: आंदोलन केलं. वाहन चालकाने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचाही विचार केला नाही. हा गोंधळ सुरु होता. घटनास्थळी चांगली गर्दी निर्माण झाली होती. काही या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. (हेही वाचा :Mumbai Traffic Police हवालदाराने टॅक्सी चालकांकडून पैसे घेतल्याचा दावा, व्हिडिओ व्हायरल )
मात्र, वाहन चालक त्याची दुचाकी माघारी मिळवण्यावर ठाम होता. दुचाकी चालकाच्या या हट्टापायी वाहतूक पोलिसांना त्यांची गाडी पुढे काढता येत नव्हती. वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. वाहन चालकाला त्याची टोईंग केलेली गाडी मिळताच तो गाडी खाली बाहेर आला. त्यानंतर काही झालेच नाही असे दाखवत तो त्याची गाडी घेऊन घरी गेला.