Kalyan to CSMT AC Local: एसी लोकलमध्ये वातानुकूलीत यंत्रणेत बिघाड; श्वास गुदमरून महिलेला आली भोवळ
AC local trains (Photo Credit: PTI)

Kalyan to CSMT AC Local : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर सुखाचा प्रवास करण्यासाठी एसी लोकल (AC Local ) कडे वळले आहेत. सध्या एसी लोकलमध्ये देखील प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. नुकत्याच एका घटनेत प्रवाशांचा घामाच्या धारांचा, गुदमरणाऱ्या परिस्थीतीचा सामना करत प्रवास करावा लागला आहे. ही घटना आज बुधवारी मुंबई कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये घडली. सोमवारपासूनच मुंबई कल्याण-सीएसएमटी एसी लोकल (Kalyan to CSMT AC Local) मध्ये वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचं निषप्ण झाले आहे. (हेही वाचा :Mumbai Local Train: महिलांचा लोकल प्रवास होणार आणखी सुखकर; जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात लागणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही)

सोमवारपासूनच मुंबई कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाला आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने बाहेरून कोणतीही हवा आतमध्ये येत नाही. त्यामुळे जर एसी लोकलमध्ये एसी बंद असल्यास प्रवाशांचा जीव गुदमरतोय. त्याचाच प्रत्यत मंगळवारी पहायला मिळाला. एका महिलेला प्रवासादरम्यान, भोवळ आली. चक्कर येऊन महिला खाली कोसळली. परिस्थीतीचे महत्त्व लक्षात घेऊन उपस्थितांनी तात्काळ महिलेवर प्रथमोपचार केले. त्यानंतर महिला शुद्धीत आली.

हा सर्व प्रकार सकाळी कल्याण येथून सीएसएमटीसाठी ८.५४ वाजता - सुटणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. या ट्रेनमधील ७०५२ सी डब्ब्यातील वातानुकूलन यंत्रणा बिघडली आहे. ही वातानुकूलन यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी यासाठी प्रवाशांनी समाजमाध्यमांद्वारे रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही दखल घेत नाहीये, असं चित्र दिसतंय.