Bus | Pixabay.com

भिवंडी, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पुढच्या दहा दिवसात कल्याण व डोंबिवलीत 5 E Bus धावणार; असे केडीएमसीच्या आयुक्त इंदुरानी जाखड यांनी याबाबत माहिती दिली. हा प्रस्ताव सामन्यांसाठी फायदेशीर असून दरात देखील नक्कीच फरक पडेल. पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या धर्तीवर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.  (हेही वाचा - Mumbai: बदलापूर येथे रेल्वेचे दरवाजे बंद केल्याप्रकरणी 3 महिला प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल)

प्रत्येक पालिकेला आणि तीन महापालिकांना 100 E बसेस देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीच्या 207 E बसेस अशा एकूण 507 E बसेसचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुढील दहा दिवसात पाच ई बसेस धावतील. तसेच चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त इंदुरानी जाखड यांनी दिली.

पुढच्या दहा दिवसात कल्याण व डोंबिवलीत 5 E बस धावणार; असे केडीएमसीच्या आयुक्त इंदुरानी जाखड यांनी सांगितले. दरम्यान या निर्णयामुळे रिक्षाचालक नाराज असून या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बदलापूरातील नागरिकांच्या मागणीला यश 

बदलापूर शहरात शासकीय परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. शहरात रिक्षाव्यतिरिक्त इतर पर्याय नसल्याने नागरिकांना रिक्षानेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे परिवहन सेवा सुरू व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. अखेर एक वर्षानंतर नागरिकांच्या मागणीला आता यश येणार आहे.