कल्याण लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल:शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्या मतांच्या लढतीत शिवसेनेचं पारडं जड, धनुष्यबाणाने घेतली गती, घड्याळाचा वेग मंदावला
Shrikant Shinde .vs. Babaji Patil (Photo credits: File Photo)

Kalyan Loksabha Constituency Loksabh Election Results 2019: आज लोकसभेच्या 17 व्या निवडणूक  (17th Loksabha Election)  पर्वातील बहुप्रतीक्षित निकालाचा (Loksabha Results)  दिवस असल्याने सकाळ पासूनच प्रत्येक भारतीयामध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.काहीच वेळापूर्वी देशभरातील मतदार संघांमध्ये मतमोजणीची सुरवात झाली असून निकाल देखील हाती येऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील 48 मतदार संघांमधील  उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. मुंबई विभागातील कल्याण मतदारसंघातून (Kalyan Loksabha Constituency) यंदा विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde)  विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी बाळाराम पाटील (Babaji Patil)  यांच्यात मतांसाठी मुख्य लढत रंगली होती. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेससाठी प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

कल्याण मतदारसंघ हा विस्तारीत असून यामध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली, कल्याण रूरल, मुंब्रा आणि कळवा या विभागांचा समावेश आहे याशिवाय अंबरनाथ विभागातून अनुसूचित जातींच्या सदस्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. निवडणुकीसाठी उभे असलेल्या मुख्य उमेदवारांमध्ये श्रीकांत शिंदे हे तरुणाईचे नेतृत्व म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  बाबाजी पाटील हे  अनुभवी उमेदवार म्हणून ज्ञात आहेत. याव्यतिरिक्त बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार रवींद्र केणे , वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडाऊ तसेच अन्य पक्ष व अपक्षांचे मिळून तब्बल 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

या दोन्ही पक्षांमधील लढत ही निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्या दिवसापासूनच पाहायला मिळत आहे. दोघांनीही जोरदार प्रचार करत अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचण्याचा प्रयत्न केला होता. प्रचाराच्या दरम्यान काँग्रेस उमेदवार बाबाजी यांनी पारंपरिक पद्धतीचा मार्ग स्वीकारला होता तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांने डिजिटल मीडियावर देखील आपले वर्चस्व निर्माण केले होते. यंदाच्या निवडणुकीत नाव उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन्हीही पक्षांनी तरुणाईला समोर ठेवून प्रचार पवित्रा स्वीकारला होता.

महाराष्ट्रातील मतदान हे चार टप्प्यात पार पडले होती यात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला कल्याण मतदारसंघात मतदान घेण्यात आले होते. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील तब्बल 18 उमेदवारांना मागे टाकत श्रीकांत शिंदे यांनी खासदारी मिळवली होती. काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांच्या विरोधात 53.50% मत मिळवून श्रीकांत यांनी शिवसेनेला जागा मिळवून दिली होती.त्यामुळे यंदाही शिवसेनेच्या या तरुण तडफदार नेतृत्वाकडून मतांच्या मोठ्या फरकांनी जिंकण्याची अपेक्षा केली जातेय. मतदान टक्केवारीच्या अहवालानुसार 2014 पेक्षा 3 टक्के अधिक मतदान यंदा झाले आहे.