दरवर्षी मुंबईच्या (Mumbai) काळा घोडा (kala Ghoda) परिसरातील स्ट्रीटवर ‘काळा घोडा’ उत्सव भरतो. संस्कृती आणि कलेशी निगडीत हा उत्सव भारतामधील महत्वाच्या उत्सवांपैकी एक मानला जातो. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा उत्सव भरणार होता, परंतू ओमायक्रॉन साथीचा रोग हळूहळू पसरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काळा घोड़ा कला महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. एकीकडे जिथे जनजीवन रुळावर येत होते, तिथे अचानक ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने दहशत निर्माण केली आहे, ज्याचा परिणाम उत्सवावर झाला आहे.
मुंबईतील सर्वात मोठा उत्सव, ‘काळा घोड़ा कला उत्सव’ कोरोना महामारी मुळे 2 वर्ष ऑनलाईन आयोजित केला गेला होता. 2022 मध्ये हा उत्सव ऑफलाईन होणार होता, परंतु आता लोकांच्या सुरक्षेमुळे आणि सरकारी धोरणामुळे काळा घोडा कला महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. काळा घोड़ा संघटनेने हा निर्णय घेतला आहे. पण काळा घोड़ा डार्ट कार्ट डॉट कॉमच्या माध्यमातून कलाकार त्यांची कला वर्षभर प्रदर्शित करू शकतील.
Though Kala Ghoda Arts Festival is delayed due to pandemic ...
KalaGhodaArtKart is on throughout 2022#KGAF2022 #KGAK #KalaGhodaArtsFestival #kgafculture #artfestival #musicfestival #livemusic #dance #artistlife #instafestival #instaart #workshop #culture #goodvibes pic.twitter.com/gxbZpBEH2B
— Kala Ghoda Arts Fest (@kgafest) December 26, 2021
याबाबत ब्रिंदा मिलर म्हणतात, ‘लोकांची सुरक्षा आणि सरकारी नियमांचे पालन करणे यामुळे ई-स्टॉलसह ऑनलाईन उत्सवाचा निर्णय घेण्यात आला होता. हा उत्सव खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे आणि लोकांचा उत्सवाचा भाग होण्याचा उत्साह आम्हा सर्वांना अधिक प्रोत्साहन देतो.’ काळा घोड़ा कला महोत्सवात नवीन आणि अनुभवी कारागिरांना संधी दिली जाते, ज्याद्वारे कलाकार त्यांची उत्कृष्ट कला जगासमोर मांडतील. (हेही वाचा: नववर्षाच्या हेतुने BMCकडून नियमावली जाहीर, जाणुन घ्या नियम)
ब्रिंदा पुढे म्हणतात, ‘यादरम्यान, आम्ही आशा करतो की लोक ऑनलाइन उपस्थिती दर्शवून या अद्भुत कलेच्या कामगिरीचे समर्थन करतील, ज्यामुळे आमच्या कलेचा वारसा जतन करण्यात मदत होईल. लवकरच या उत्सवाच्या पुढील नियोजित तारखा जाहीर केल्या जातील.’