'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशन झाल्यापासूनच एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी केलेली तुलना अनेकांना पटली नसल्याने राज्यभर निदर्शनं ही करण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी हे पुस्तकावर निषेध नोंदवला तर संभाजी ब्रिगेडने या सांघटनेने भाजपला हे पुस्तक मागे घेण्याची धमकीच दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून, शिवरायांच्या वंशजांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, उदयनराजे भोसले यांनी आज उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.
उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. याला उत्तर दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत, ट्विटरवर लिहिले, "होय शरद पवार हे "जाणता राजा " आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,स्त्रीयांचे प्रश्न.. प्रश्नांची मालिका सांगा.सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून.."
होय शरद पवार हे "जाणता राजा " आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न,औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,स्त्रीयांचे प्रश्न..
प्रश्नांची मालिका सांगा.सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून.. pic.twitter.com/UQarxwgSuG
— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) January 14, 2020
दरम्यान, या व्हिडिओमध्ये आव्हाड म्हणाले, "होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीमधील प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका सांगा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांच उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काहीजण सांगतात की त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. अगोदर महिलांना ३० टक्के आरक्षण नंतर महिलांना ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठास आंबेडकरांच नामकरण करणं, कोकण रेल्वे, जेएनपीटी असे अनेक प्रकल्प आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या ६० वर्षांच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. होय म्हणूनच ते जाणते राजे आहेत.”
दरम्यान, या व्हिडिओमध्ये आव्हाड म्हणाले, "काहीजण सांगतात की त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. अगोदर महिलांना 30 टक्के आरक्षण नंतर महिलांना 50 टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठास आंबेडकरांच नामकरण करणं, कोकण रेल्वे, जेएनपीटी असे अनेक प्रकल्प आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या 60 वर्षांच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. होय म्हणूनच ते जाणते राजे आहेत.”