Shiv Sena leader Sanjay Raut, anti-CAA protests and Union HM Amit Shah. (Photo Credit: PTI)

झारखंड विधानसभेची (Jharkhand Vidhansbaha Electios 2019) मतमोजणी आज, 23 डिसेंबर सकाळपासून सुरु आहे, सध्या समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार महागठबंधन (Mahagathbandhan)  म्हणजेच कॉग्रेस (Congress) , आरजेडी (RJD) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) यांची युती विजयी ठरण्याचे पूर्ण संकेत आहेत. या अनपेक्षित आकडेवारीमुळे भाजपाची (BJP) झारखंड मधील सत्ता साहजिकच धोक्यात आली आहे, अशावेळी भाजपच्या या संभाव्य पराभवावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. भाजप पक्ष जातीय मुद्द्यावरून देशात विभाजन करू पाहत होता पण हा डाव झारखंडमधील नागरिकांनी उलटून लावला अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर शाब्दिक वार केला आहे. Jharkhand Vidhan Sabha Election 2019 Results Live News Updates

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना अमित शहा यांच्यावर देखील चांगलाच हल्ला चढवला, गृहमंत्र्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून प्रचार करत हिंदू मुस्लिम ऐक्य विभागण्याचा प्रयत्न केला, पण झारखंडच्या लोकांनी हे मान्य केले नाही असेही राऊत यांनी म्हंटले आहे. याच मुद्द्यावरून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात जाहीर सभा घेऊन CAA वर भाजपचे भूमिका स्पष्ट केली होती.

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला 37 तर आजसूला 5 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विधानसभेत 41 हा बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी भाजपला आजसूची मदत घ्यावी लागली. दरम्यान, आपले बहुमत अधिक बळकट करण्यासाठी भाजपने पुढे झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन सरुकार स्थापन केले होते. पण आता ही सत्ता भाजपच्या हातून निसटताना दिसत आहेत.

काही वेळापासून JMM ही 40 जागांवर तर भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे. आजसू 4 जागी आणि जेवीएस 3 जागी आघाडीवर आहे . हा जागांचा फरक टिकवुन ठेवण्यात JMM ला यश आल्यास हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात.