
प्रसिद्ध देवस्थान जेजुरी खंडोबा (Jejuri Khandoba चरणी तब्बल अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार (Silver Necklace) अर्पण करण्यात आला आहे. हा हार खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी अर्पण केला आहे. मातोश्री दिवंगत कमलाबाई लोढा यांच्या स्मरनार्थ हा हार अर्पण करण्यात आल्याचे राजकुमार लोढा यांनी म्हटले आहे. कमलाबाई यांचे सव्वा वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या पूत्रांनी खंडोबाला हार अर्पण केला. कांतीलाल लोढा यांनी सांगितले की, त्यांच्या मातोश्री कमलाबाई लोढा यांना धार्मिक कार्याची आवड होती. त्या खंडोबाच्या भक्त होत्या. त्यामुळे खंडोबाचरणी रत्नजडीत हार अर्पण करण्यासठी त्या प्रदीर्घ काळापासून पैसे साठवत होत्या. दरम्यान, त्यांचे निधन झाले. त्यामुळे आम्ही त्यांची उर्वरीत इच्छा पूर्ण केली.
दरम्यान, मातोश्रींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोढा कुटुंबीयांनी खंडोबाला हार अर्पण केला. सोमवारी विधिपूर्वक पूजा केल्यावर लोढा कुटुंबीयांनी खंडोबाला हार अर्पण केला. या वेळी विश्वस्त राजकुमार लोढा त्यांच्या पत्नी विद्या, मुलगा सुमित उपस्थित होते. राजस्थान येथील कुशल कारागिरांनी हा हार बनविल्याचे लोढा यांनी सांगितले.