मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा नीट (NEET) आणि इंजिनियरिंग प्रवेश पूर्व परीक्षा जेईई (JEE) वरुन सध्या देशभरात गोंधळ उडाला आहे. परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये चिंतेते वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी यावर भाष्य केले आहे. ट्विटद्वारे आपले मत नोंदवताना विद्यार्थ्यांच्या त्रासाचा विचार करूनच केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे गृहमंत्री म्हणाले.
"जेईई आणि नीट या परीक्षांचा विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड तणाव आहे. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना तयारी करणे अवघड झाले आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.म्हणूनच विद्यार्थ्यांच्या त्रासाचा विचार करूनच केंद्र सरकारने निर्णय घ्यावा," असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. (नीट, जेईई विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय खुला- एनटीए)
अनिल देशमुख ट्विट:
There is extreme distress among students & parents for JEE & NEET exams. #Covid19 situation has made students' preparations difficult.These exams are career-defining for them hence decision to conduct these exams by Central Govt.should only be made after reviewing their agony.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 23, 2020
यंदा दोन्ही परीक्षांसाठी देशातून सुमारे 27 लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोना व्हायरस संकटामुळे एप्रिल पासून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर अखेर सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर इतक्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परीक्षा देणे धोक्याचे आहे. त्याचबरोबर इतर अनेक आव्हाने देखील समोर आहेत. त्यामुळेच परीक्षा सप्टेंबरमध्ये न घेता पुढे ढकलाव्यात असे विद्यार्थ्यांसह पालकांचे म्हणणे आहे.