कोरोना संदर्भात Sambhaji Bhide यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर Jayant Patil यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Sambhaji Bhide, Jayant Patil (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचपार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

मुळात कोरोना हा रोग नाही. सरकारने काहीही करू नये, ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही. कोरोनाने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत.,' असे म्हणत सांगलीमध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याला प्रत्युत्तर देत जयंत पाटील म्हणाले की, संभाजी भिंडेंचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, अशाप्रकारची वक्तव्य कोरोनाला आळा घालण्यासाठी बाधा ठरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनाही कोरोना झाला होता,' अशा शब्दात जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हे देखील वाचा- Pandharpur-Mangalwedha Assembly By-Elections: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

दरम्यान, साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनाही संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर म्हणाले होते की, "मला माझे प्रश्न विचारा. कोण काय म्हणाले? ते मला विचारू नका. ते ज्या अँगलने बोलले त्यांनाच माहिती आहे. हवे तर, मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन", असे उदयनराजे म्हणाले होते.

महाराष्ट्रासाठी कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक भयंकर ठरली आहे. राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. परिणामी, आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असून रुग्णालयांमध्ये बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता भासत असल्याचे चित्र राज्यभरात निर्माण होऊ लागले आहे.