महाराष्ट्राचं राजकारण हे 'पवार' घराण्याशिवाय अपूर्ण आहे. आज शरद पवारांनंतर तिसरी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरली आहे आणि त्यांनादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) या रोहित पवारांच्या (Rohit Pawar) विधानसभा मतदारसंघात त्यांना मिळालेल्या प्रतिसादामधून त्याची प्रचिती आलीच आहे. नुकतेच सध्या विधानसभा मतदार संघाच्या दौर्यावर असलेल्या रोहित पवारांना 2 चिमुकल्यांकडून एक गोड गिफ्ट मिळालं आहे.ट्वीटरच्या माध्यामातून रोहित पवारांसाठी चिमुकल्या बहीण-भावांनी बनवलेलं अफलातून ग्रीटिंग कार्ड शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जामखेडमध्ये चौथीमध्ये शिकणार्या सृष्टी शिंदे हीने रोहित पवार यांच्यासाठी त्यांचे काही फोटो जमवून आकर्षक DIY ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. रोहित पवारांचे वेगवेगळे फोटो खास पद्धतीने सजवून बनवलेल्या ग्रीटिंग कार्ड्सने रोहित पवार देखील भारावून गेले. ट्वीटर वर हे ग्रीटिंग कार्ड शेअर करत 'आपुलकीच्या शुभेच्छा खूप कमी जणांच्या नशिबी असतात' असं म्हणत सृष्टीचे आभार मानले आहेत.
रोहित पवारांसाठी सृष्टीने बनवलेलं ग्रीटिंग
जामखेडमध्ये सृष्टी शरद शिंदे या चौथीतील विद्यार्थीनीने माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे प्रासंगिक फोटो वापरून एक आकर्षक व अफलातून Birthdy Card तयार केलं होतं.तिचा छोटा भाऊ धर्मराजसोबत तिने ते मला भेट दिलं.अशा आपुलकीच्या शुभेच्छा खूप कमी जणांच्या नशिबी असतात.
Thank You सृष्टी दिदी! pic.twitter.com/plVp2DgCaZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2020
आमदार रोहित पवार यांचा बर्थ डे 29 सप्टेंबर दिवशी असतो. यंदा तो कोरोना वायरस लॉकडाऊनमध्येच पार पडला. बर्थडेच्या दिवशी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं, सार्वजनिक कार्यक्रम टाळत एखाद्या समाज उपयोगी कार्यक्रमात सहभागी होऊन गरजवंतांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बर्थ डे नंतर 2 महिन्यांनी मतदार संघात आलेल्या आमदार रोहित पवारांची भेट घेत सृष्टी आणि धर्मवीर या दोन भावंडांनी त्यांचं ग्रीटिंग शेअर केले आहे.