नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना भाविकांचा बस नदीत कोसळून मृत्यू  झाला होता. या अपघातात मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. वायुसेनेच्या विमानाने मृतदेह विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झालीये. थोड्याच वेळात आहेत. नेपाळ बस अपघातामधील सत्तावीस पैकी जळगावमधील पंचवीस मृतदेह  हे भारतीय वायू सेनेच्या विमानाने आणण्यात आले आहेत. उर्वरित दोन मृतदेह हे उत्तर प्रदेशातील असल्याने ते त्या ठिकाणी उतरवण्यात आले आहेत.  (हेही वाचा - Nepal Bus Accident: 40 प्रवाशांना नेपाळला घेऊन जाणारी भारतीय बस नदीत पडली; 14 जणांचा मृत्यू, 16 बचावले)

पाहा पोस्ट -

देवदर्शनासाठी भाविक नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना ही बस दरीत कोसळली होती. त्या भाविकांचा बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हे जळगाव विमानतळ येथे दाखल होणार होते. हे मृतदेह आणण्यासाठी  26 ॲम्बुलन्सचा ताफा दाखल झाला होता.  नेपाळ मध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगांव जिल्ह्यातील 25 नागरिकांचे पार्थिव घेऊन भारतीय वायु दलाच्या विमानाने आज सायंकाळी 7.00 वाजता जळगाव विमानतळ येथे पोहचले.