Chaturmas Festival 2020: कोरोना विषाणुने (Coronavirus) राज्यात धुमाकूळ घातला आहे. अशात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चातुर्मास पर्वासाठी (Chaturmas Parva) जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करता येणार आहे. जैन समाजाच्या चातुर्मास पर्वाला 18 जून पासून सुरुवात होणार आहे. जैन समाजात चातुर्मासाचा कार्यकाळ श्रावक श्राविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे जैन समाजातील नागरिकांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
चातुर्मास पर्वात जैन साधू व साध्वी महाराष्ट्र व कर्नाटक मधील काही भागांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जातात. यावेळी त्यांच्यासोबत मोजका सेवकवर्ग असतो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. त्यामुळे यंदा पायी चालत जाण्यास परवानगी मिळणार की नाही? असा प्रश्न श्रावीकांना पडला होता. (हेही वाचा - Unlock 1 Guidelines: कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ; केंद्र सरकारकडून कंन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी)
जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. #सोशलडिस्टंसिंग , पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित प्रवास करणार नाहीत आदी अटीनुसार प्रवास करून या साधु-साध्वींना चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी परवानगी . pic.twitter.com/xyTzYLWYBQ
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) May 30, 2020
लॉकडाऊनमुळे त्यांच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जैन श्रावीकांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन साधूंना प्रवासाची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, राज्यमंत्री यड्रावकर यांनी यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क केला. या चर्चेनंतर शासकीय नियमांचे पालन करत जैन साधू आणि साध्वींना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.