दिल्ली येथील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसेनंतर (Jahangirpuri Violence) प्रशासनाने केलेल्या बुलडोजर कारवाईवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनीही एकूण प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. जहांगीरपुरी येथे करण्यात आलेली कारवाई म्हणजे थेट राज्यघटनेवरच केलेला हल्ला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. जहांगीरपुरी येथील हिंसाचारानंर भाजपची सत्ता असलेली एमडीसीद्वारा करण्यात आलेल्या कारवाईवर टीका करताना सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरही ही कारवाई प्रशासनाकडून सुरुच ठेवण्यात आल्यावर आक्षेप नोंदवला.
राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, ही कारवाई म्हणजे भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन आहे. इथे गरीब आणि अल्पसंख्याक लोक राहतात. त्यांना लक्ष्य करण्याचा भाजपचा विचार आहे. या लोकांना आपलेसे करुन त्यांच्याबद्दलचा तीरस्कार दूर करण्याची आवश्यकता असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (हेही वचाा, Delhi: जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी, आता उद्या होणार सुनावणी)
राहुल गांधी यांनी आज सकाळीही ट्विट करुन यामुद्द्यावर भाष्य केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'मोदी जी, महागाईचा काळ आहे. या काळात वीजकपातीमुळे उद्योग उद्ध्वस्त होतील. ज्यामुळे भविष्यात नोकऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होईल. त्यामुळे नफरतचा बुलडोजर चालवणे बंद करा आणि विद्यूत प्रवाह पुन्हा सुरु करा.'
ट्विट
This is a demolition of India’s constitutional values.
This is state-sponsored targeting of poor & minorities.
BJP must bulldoze the hatred in their hearts instead. pic.twitter.com/ucSJK9OD9g
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2022
काँग्रेस नेते शशि थरुर यांनी म्हटले की, राजनीतीचा खेळ आता खूप घाणेरडा झाला आहे. जहांगीरपुरी येथील कारवाईचा एक फोटो ट्विट करत थरुर यांनी म्हटले आहे की, इथला प्रत्येक जण आज असहाय आणि निराधार झाला आहे. आता राजकीय खेळ खूपच घाणेरडा झाला आहे.
उत्तर प्रदेशच्याच धर्तीवर जहांगीरपुरी येथे बुलडोजर कारवाई करण्यात येत असल्याचा हल्ला समाजवादी पार्टीने भाजपवर केला आहे. समाजवादी पक्षाने ट्विट केले आहे की, संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढेही जहांगीरपुरी येथे बुलडोजर चालवला गेला. बुलडोजर गंगा जमुनेचा प्रवाह, शांतता, सद्भावना आणि गरीबांची भाकरी हिसकावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन करणारा हा संदेश भारताची संस्कृती आणि परंपरा उद्ध्वस्त करेन.