Mumbai High Court | (Photo Credit: ANI)

अल्पवयीन मुलींवर (Minor Girl) होणाऱ्या अत्याचाराला रोख लावण्यासाठी न्यायालयाने अनेक अरोपींना कठोर शिक्षा सुनावली आहे. यामुळे अल्पवयीन मुलीची छेड काढणे एखाद्याला महागात पडू शकते. याचपार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) लैंगिक अत्याचारप्रकरणी (Sexual Abuse) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या गालाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. लैंगिक हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण 'पोक्सो' अंतर्गत (POCSO) गुन्हा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

संबंधित 46 वर्षीय व्यक्तीवर 8 वर्षाच्या मुलीच्या गालांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होता. मुलीच्या आईने ठाण्यात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुलै 2020 पासून या व्यक्तीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नाही, असे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. हे देखील वाचा- Ganeshotsav 2021: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 'या' नियमांचे पालन करावे लागणार

पॉक्सो कायद्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीने लैंगिक शोषणाच्या हेतूने अल्पवयीन मुलगा किंवा मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केले किंवा त्यांना आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास भाग पाडले किंवा लैंगिक हेतून शारिरीक संपर्क होईल, अशी कोणतीही गोष्ट केल्यास तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे.