पुणे: डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या प्रवाशाने ऑम्लेट मध्ये अळ्या सापडल्याच्या तक्रारीची IRCTC कडून दखल; केटररला ठोठावला 25,000 रूपयांचा दंड
Deccan Queen (Photo Credits: indiarailinfo.com)

जुलै 2019 मध्ये डेक्कन क्वीन एक्सप्रेसने (Deccan Queen Express)  प्रवास करणार्‍या सागर काळे  या तरूणाला ऑम्लेटमध्ये अळ्या सापडल्यानंतर केलेल्या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. IRCTC ने या प्रकरणी संबंधित केटररला 25,000 रूपयांचा दंड ठोठावला आहे. Boon Catering Company Private Limited या मुंबईतील कॅटरिंग कंपनीला डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील जेवणाच्या सोयीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं.

TOI च्या बातमीनुसार 17 जुलै दिवशी सोमवार पेठेतील रहिवासी सागर काळे डेक्कन क्वीन एक्सप्रेसने प्रवास करत होता दरम्यान त्याने काही पदार्थांची ऑर्डर दिली. पहिल्यांदा सर्व्ह करण्यात आलेल्या पदार्थांवर मीठ- मीरपूठ टाकताना त्याला अळ्या दिसल्या त्यानंतर ती ऑर्डर बदलून ऑम्लेट देण्यात आलं. मात्र त्यावरही अळ्या दिसल्या. या प्रकारानंतर सागरने तक्रार केली. पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार IRCTC ने तक्रारीची दखल घेत कारवाई करताना संबंधित केटरर्सना वॉर्निंग देखील दिली आहे.

दरम्यान जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक बंद होती त्यामुळे सागरला तात्काळ तक्रार दाखल करता आली नाही मात्र जेव्हा वाहतूक पूर्ववत झाली तेव्हा पुण्यात तक्रार दाखल केली. अभिनेत्री Meera Chopra ला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणात आढळले जिवंत किडे; सोशल मीडियात शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

यंदा डेक्कन क्वीन एक्सप्रेसने जून महिन्यात 90 वर्ष पूर्ण केली आहेत. डायनिंग कार म्हणून या गाडीची खास ओळख आहे. रेल्वे प्रवासी संघटनेच्या मदतीने सागर यांनी ही तक्रार केली. त्याची दखल घेत केटरर्सला आता दंड ठोठावण्यात आला आहे.