Iqbal Singh Chahal यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात; Additional Chief Secretary पदी नियुक्त
BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

माजी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यावर आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary in CMO) पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. भूषण गगराणी यांच्या जागी आता इकबाल सिंह चहल यांना पदभार देण्यात आला आहे. चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी कोविड काळात म्हणजे 8 मे 2020 दिवशी बीएमसीच्या आयुक्त पदाचा कारभार स्विकारला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियममानुसार, जे अधिकारी एकाच जागी 3 वर्ष किंवा स्वगृही 3 वर्ष पेक्षा जास्त काळ काम करत आहेत त्यांना तातडीने दुसर्‍य ठिकाणी बदली द्यावी. Bhushan Gagrani new BMC Commissioner: Iqbal Singh Chahal नंतर आता भूषण गगराणी बीएमसीचे नवे आयुक्त .

चहल हे ते चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि चार वर्षे औरंगाबादचे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक होते. कोरोना काळात त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी देण्यात आली. चहल यांच्या कामकाजाचा अनुभव कोविड काळात मुंबईकरांसाठी वरदान ठरला. त्यांच्या उपाययोजनांमुळे मुंबई कोविड काळात सावारण्यात मोठी मदत झाली. अनेक स्तरांतून त्यांच्या कामकाजाचे कौतुक करण्यात आले होते.

इकबाल सिंह चहल यांच्यासोबत पी वेलरासू, 2002 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, यांना देखील दोन दिवसांपूर्वी EC निर्देशानुसार मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) म्हणून बदलण्यात आले. त्यांना आता मंत्रालयात (राज्य सचिवालय) सामाजिक न्याय विभागात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.