Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials (फोटो सौजन्य -X/@ians_india)

Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रसार सभांचा सपाटा लावला आहे. अशातचं निवडणूक आयोग (Election Commission) देखील आपले कर्तव्य चोखपणे पार पाडताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनी शनिवारी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी (Helicopter Check) केली. तथापी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हेलिकॉप्टरचीही रायगडमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांची बॅगही तपासण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवडणूक रॅलीपूर्वी हिंगोली येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगचीही तपासणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा यांनी म्हटलं होतं की, निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या बॅगा तपासत आहे. भाजपचा निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक प्रणालीवर विश्वास आहे. आमता पक्ष निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. (हेही वाचा -Maharashtra Bag-Check Row: निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये; EC अधिकाऱ्यांकडून नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी (Watch Video))

राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी, पहा व्हिडिओ - 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक अधिकारी राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी करत आहे. मात्र, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, निवडणूक आयोग कोणताही भेदभाव न करता सत्ताधारी महायुती तसेच राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करत आहे. (हेही वाचा - Uddhav Thackeray's Bag Checked: उद्धव ठाकरे यांची सलग दुसऱ्या दिवशीही हेलिपॅडवर तपासली बॅग; जाहीर सभेत भडकले पक्षप्रमुख)

निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले की, भाजपच्या व्यक्तींसह राजकीय नेत्यांची विमाने आणि हेलिकॉप्टर यांची नियमितपणे निवडणूक अधिकारी प्रस्थापित व्यावसायिक प्रक्रियेनुसार तपासणी करत आहेत. या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि इतर नेत्यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली आहे.