INS Vikrant: किरीट सोमय्या यांचे पुत्र निल यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला
Kirit Somaiya, Neil Somaiya | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचावासाठी पैसे गोळा केल्याच्या प्रकरणात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांनाही सत्र न्यायालयाने (Sessions Court) अटकपूर्व जामीन फेटाळत जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे आयएनएस बचाव प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पितापुत्रांनी वेळीच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली नाही तर मात्र दोघांवरही कडक कारवाई होऊ शकते.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांना आगोदरच धक्का दिला आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या नेमके आहेत तरी कोठे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एरवी दररोज प्रसारमाध्यमांना सामोरे जात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कथीत भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे किरीट सोमय्या अचानक गायब झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटते आहे. नाही म्हणायला किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. परंतू, तो व्हिडिओ नेमका कुठे चित्रित करण्यात आला याबाबत मात्र कोणालाच जाहीरपणे माहिती नाही. (हेही वाचा, INS Vikrant Cheating Case: Kirit Somaiya च्या घरी EOW चं पथक चौकशीसाठी; सोमय्या घरी नसल्याने 13 एप्रिलला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस)

प्रकरणातील एकूणच गुंतागूंत विचारात घेता सोमय्या पितापुत्रांची अडचण चांगलीच वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'आयएनएस विक्रांत बचाव' फाईल ओपन केल्यापासून सोमय्या पहिल्यांदाच बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. आयएनएस बचावासाठी निधी गोळा केल्यानंतर झालेल्या कधीत घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा एका माजी सैनिकाने दाखल केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आयएनएस निधी प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातही शोधमोहीम राबवल्याचे वृत्त आहे.

किरीट सोमय्या महाविकासआघाडीतील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढताना भाजप नेते जोरदार समरथन करत होते. आता किरीट सोमय्या अडचणीत आल्यानंतर याच नेत्यांची भूमिका काय हे पुढे येऊ शकणार आहे. विधनस परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी किरीट सोमय्या यांचे समर्थन करत ते लपणारे नव्हे तर लढणारे नेते असल्याचे म्हटले आहे.