![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/ranveer-allahbadia-ac.jpg?width=380&height=214)
Social Media Outrage: 'इंडियाज गॉट लेटेंट' (India’s Got Latent) कार्यक्रम वादाच्या केद्रस्थानी आला असून, सदर कार्यक्रमातील काही भागांमध्ये करण्यात आलेल्या अश्लील टिप्पण्या आणि वक्तव्यांवरुन कायदेशीर कारवाईस सुरुवात झाली आहे. या वादग्रस्त YouTube शोमधील अश्लीलतेच्या आरोपांची मुंई पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यानच, याच प्रकरणाच्या चौकशीसाठी असम पोलिसांचे (Assam Police) एक पथक मुंबईत बुधवारी (12 फेब्रुवारी) दाखल झाले. गुवाहाटी गुन्हे शाखेने आशिष चंचलानी (Ashish Chanchlani), जसप्रीत सिंग, अपूर्व माखीजा, रणवीर अलाबादिया (Ranveer Allahbadia) आणि समय रैना यांच्यासह अनेक प्रसिद्ध YouTubers आणि प्रभावकारांविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर ही चौकशी सुरू झाली. तत्पूर्वी केंद्र सरकारनेही या प्रकरणाची गंभीरपणे नोंद घेतली असून, युट्युबला सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले. ज्यामुळे तत्काळ कार्यवाही करत युट्युबनेही संबंधित टीप्पणीचा व्हिडिओ हटवला आहे.
अश्लील कंटेंट आणि अनुचित टिप्पण्यांचा आरोप
अलोक बोरुआ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुवाहाटी गुन्हे शाखेने आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्व माखीजा, रणवीर अलाबादिया (बीअरबायसेप्स) आणि समय रैना यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमाचे निर्माते आणि त्यात सहभागी प्रभावकांवरअश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आणि मुलां-पालकांच्या संबंधांबद्दल अनुचित टिप्पण्या करण्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, गुवाहाटीचे सहपोलीस आयुक्त अंकुर जैन यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या निर्देशानंतर युट्युबने सदर व्हिडिओ सध्या त्यांच्या मंचावरुन हटवला आहे. मात्र, चौकशीचा भाग म्हणून या त्या कार्यक्रमाचा संबंधित विशिष्ट भाग (एपिसोड) परत मिळविण्यासाठी अधिकारी YouTube सोबत काम करत आहेत. आम्ही हटवलेला व्हिडिओ मिळविण्याच्या प्रक्रियेत आहोत. तो एकदा पुनर्प्राप्त झाल्यानंतर, आमचे पथक आवश्यक कारवाईसाठी पुन्हा मुंबईला जाईल, असे जैन यांनी मंगळवारी सांगितले. (हेही वाचा, 'Sex With Parents' Controversy: अश्लिल विनोद प्रकरणी YouTube कडून कारवाई, Ranveer Allahbadia याचा व्हिडिओ हटवला; काय घडलं आतापर्यंत?)
रणवीर अलाहबादियाकडून माफी
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या मालिकेतील एका भागात रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकासमोर लैंगिक भाषेत टिप्पणी केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. ही टिप्पणी प्रामुख्याने आई-वडील आणि पालकांमध्ये होणाऱ्या लैंगिक संबंधांवर आधारीत होती. या टिप्पणीसह हा कार्यक्रम प्रसारीत झाल्याने. सदर कार्यक्रमाची सामग्री अश्लील असल्याचा आरोप झाला. ज्यामुळे जनमानसात आणि सोशल मीडियावरही प्रचंड वाद आणि टीका झाली. राजकीय वर्तुळातून आणि त्यासोबतच इतरही विविध माध्यमांतून या टिप्पणीची दखल घेण्यात आली. ज्यामुळे हा कार्यक्रम आणि प्रभावक वादाच्या केंद्रस्थानी आले. वाद वाढत असताना उपरती झाल्याने नंतर मग ही टिप्पणी करणाऱ्या अलाहबादिया याने जाहीर माफी मागितली. माफी मागताना त्याने मान्य केले की त्यांच्या टिप्पण्या अयोग्य आणि अनुचित होत्या. त्याने असेही पुष्टी केली की वादग्रस्त भाग प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे. (हेही वाचा: FIR Against Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाच्या अडचणी वाढल्या; माफी मागितल्यानंतरही FIR दाखल)
असम पोलीस मुंबईत दाखल
A team of Assam Police has gone to Mumbai to investigate the case related to India's Got Latent after the Guwahati Crime Branch registered FIR against YouTubers and social Influencers, namely Ashish Chanchlani, Jaspreet Singh, Apoorva Makhija, Ranveer Allahbadia, Samay Raina and…
— ANI (@ANI) February 12, 2025
मुंबई पोलीस, कारवाई आणि प्रकरणाचा तपास
दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या वतीने प्राथमिक तापसाचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे निर्माते, त्यात सहभागी होणारे प्रभावक आणि इतरांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याशिवाय पोलिसांचे एक पथक अलाहबादिया याच्या घरीही जाऊन चौकशी करुन आले. डीसीपी (झोन नववी) दीक्षित गेडाम यांनी पुष्टी केली की, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी, खार पोलिस या प्रकरणाची चौकशी आणि तपास करत आहेत. मुंबई पोलिसांची कारवाई सुरु असतानाच असम पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे.
राजकीय प्रतिक्रिया आणि कायदेशीर घडामोडी
‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्क्रमाचा वादग्रस्त भाग युट्युबवर प्रसारित होता जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. खास करुन सोशल मीडियावर प्रचंड संताप पाहायला मिळाला. या प्रकरणात राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आली. ज्यामुळे कायदेशीर घडामोडी वेगाने घडल्या. त्यातील ठळक घडामोडी खालील प्रमाणे:
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर देत सांगितले की, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी ते इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करू नये'.
- शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी या वक्तव्याचा निषेध केला आणि महाराष्ट्रात अशा भाषेला स्थान नाही असे प्रतिपादन केले.
- राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तक्रारीची चौकशी करत असल्याचे म्हटले आहे.
- दिल्लीतील एका वकिलाने सायबर पोलिसांकडे संपर्क साधला आहे आणि भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याचे नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली संपूर्ण कार्यक्रमावरच बंदी घालण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फॉलोअर्स असलेल्या रणवीर अलाहबादियाला अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय निर्माता पुरस्काराने (National Creators Award 2024) सन्मानित केले होते. सम आणि मुंबई दोन्ही ठिकाणी चौकशी सुरू असल्याने, पुनर्प्राप्त व्हिडिओ सामग्रीचे पुनरावलोकन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करण्याची अपेक्षा आहे. कायदेशीर तज्ञांचे म्हणणे आहे की जर आरोप सिद्ध झाले तर आरोपी युट्यूबर्सना भारताच्या अश्लीलता आणि आयटी कायद्यांतर्गत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.