![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/61-122.jpg?width=380&height=214)
FIR Against Ranveer Allahbadia: लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहबादिया (Ranveer Allahbadia) ने सोमवारी युट्यूब कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमधील त्याच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली. आपल्या माफिनाम्यात रणवीर म्हणाला की, मी भारताबद्दल जे बोललो ते मी बोलायला नको होते. मला माफ करा. ती माझी टिप्पणी अयोग्य होती. मी फक्त सॉरी म्हणायला इथे आलो आहे. तुमच्यापैकी अनेकांनी विचारले असेल की मला माझा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा आहे का? अर्थात मला हा प्लॅटफॉर्म अशा प्रकारे वापरायचा नाही.
मात्र, सॉरी म्हटल्यानंतरही रणवीर अलाहाबादियाचा त्रास कमी होत नाहीये. एनएचआरसी सदस्य प्रियांक कानुंगो यांनी यूट्यूबच्या सार्वजनिक धोरण प्रमुख मीरा चॅट यांना पत्र लिहून यूट्यूबने संबंधित सामग्री/व्हिडिओ काढून टाकण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी रणवीर अलाहाबादिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कारवाईचा अहवाल हे पत्र जारी झाल्यापासून तीन दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा, असं कानुंगो यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. (हेही वाचा -Ranveer Allahbadia Apologised: युट्युबर रणवीर अल्लाहबादीया कडून वादग्रस्त विधानानंतर माफीनामा)
युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाच्या टिप्पणीवरील वादावर वकील आशिष राय म्हणाले की, 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोच्या काही व्हायरल व्हिडिओंबाबत मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात अश्लील भाषा आहे जी कोणत्याही सामान्य व्यक्तीला अस्वस्थ करू शकते. दोन दिवसांपूर्वी असे व्हिडिओ समोर आले आहेत, ज्या अश्लील वक्तव्य आहेत. यामागचा उद्देश त्यांना अधिक पैसे कमवण्याचा आहे. आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि महाराष्ट्र महिला आयोगाला लेखी तक्रार देखील दिली आहे. (वाचा - YouTube Controversy: रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात तक्रार; आई-वडिलांमधील लैंगिक संबंधाबाबत वक्तव्य भोवले. )
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला याची माहिती मिळाली आहे. मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही. गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या आणि सादर केल्या आहेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. आपण आपल्या समाजात काही नियम बनवले आहेत, जर कोणी त्यांचे उल्लंघन केले तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.