तुम्ही जर शासकीय नोकरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. तर भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जवळजवळ 3650 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी केवळ 10 वी पास असणे अनिवार्य आहे. निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. ग्रामीण पोस्ट सेवकाच्या पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख 30 नोव्हेंबर 2019 ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत अर्जाची फी सुद्धा याच दिवसापर्यंत भरता येणार आहे.
नोकरभरतीसाठी भारतीय पोस्ट ऑफिसात ब्रांन्च पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांन्च पोस्ट मास्टर आणि डाक सेवा पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाईट appost.in/gdsonline वर जाऊन अर्ज करता येणार आहे. तर जाणून घ्या अर्जाची पूर्ण प्रकिया कशी असणार आहे.(7th Pay Commission: सरकारी खात्यात 25 जागांसाठी भरती; उमेदवारांना मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार 34,000 ते 2,09,200 रुपये इतकी वेतनश्रेणी)
>>पदाचे नाव
ब्रांन्च पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांन्च पोस्ट मास्टर आणि डाक सेवक
>>पदांची संख्या
3650
>>शिक्षण
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी पास केलेली असावी. तसेच स्थानिक भाषा येणे अत्यावश्यक आहे.
>>वय
उमेदवाराचे वय 18-40 वर्ष असावे.
या नोकरीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असल्यास त्यासाठी तुमची निवड 10 वी मिळालेल्या गुणांनुसार केली जाणार आहे. तसेच योग्य उमेदवाराला यापुढील माहिती पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळावरुन मिळणार आहे.