CSMT Ahead Of 74th Independence Day (Photo Credits: PTI)

Independence Day 2020: उद्या स्वतंत्र भारताला 73 वर्ष पुर्ण होत आहे, तर उद्या भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. भारतामध्ये यंदा 15 ऑगस्टच्या सकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा असा हा दिवस उद्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी पेक्षा किंचित कमी धामधुमीत साजरा होईल मात्र स्वरुप लहान मोठे असले तरी उत्साह आणि देशप्रेम काही कमी झालेले नाही, होणारही नाही, हो ना? उद्या वर येऊन ठेपलेल्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काल मुंंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि बीएमसी (BMC) च्या इमारतींंवर तिरंंग्याचे रंंग झळकले होते. या क्षणाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

मागील काही वर्षांपासुन, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सीएसएमटी स्थानकावर प्रोजेक्टरच्या मदतीने तिरंंग्याचे सुंंदर दृश्य झळकावले जाते. या लाईट शो ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. अनेक जण हे दृश्य पाहण्यासाठी खास याठिकाणी भेट सुद्धा देतात. मात्र यंंदा हे दृश्य ऑनलाईन बघुनच अनुभव घ्या. चला तर मग..

CSMT व BMC बिल्डिंग वर तिरंंग्याचे दर्शन

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Mirror (@_mumbaimirror) on

दरम्यान, कॅनडा मध्ये सुद्धा नायगरा फॉल्स, 553 मीटर उंच असलेल्या CN Tower,  सीटी हॉल जवळील three-dimensional Toronto sign जवळ देखील भारताचा झेंडा तिरंग्याच्या लाईट्समध्ये रोषणाई केली जाणार आहे. या रोषणाईला सुरूवात विकेंडपासून सुरूवात होणार आहे. तर नायगरा धबधब्यावर 15 ऑगस्ट संध्याकाळी ध्वजारोहण होईल. रविवारी (16 ऑगस्ट) दिवशी CN Tower वर ध्वजारोहण होईल. तर Toronto sign वरील रोषणाई दोन्ही दिवशी ठेवली जाणार आहे.