मुंबई शहरामध्ये वाढता कोरोना व्हायरसचा धोका पाहता आता आरोग्ययंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी सरकार आणि प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहेत. आता मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड 19 चा धोका पाहता शहरातील सार्या हॉस्पिटलमधील डीन्स आणि मेडिकल सुप्रिटेंडंट्स यांना त्यांच्या कडे काम करणार्या कर्मचार्यांचा कॉन्ट्रॅक्ट वाढवण्याचाचे अधिकार दिले आहेत. दरम्यान नजिकच्या काळामध्ये ज्या कर्मचार्याचं कॉन्ट्रॅक्ट संपेल त्यांना आता मुदतवाढ देऊन कामावर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासोबतच मुंबईमध्ये सुमारे 144 जागांसाठी नुकत्याच वॉर्ड बॉयसाठी मुलाखती देखील झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी आरोग्यक्षेत्राशी निगडीत काम केलेल्या, अनुभव असलेल्या किंवा शिक्षण असलेल्यांना 'कोव्हिड योद्धा' म्हणून समोर या आणि या आजाराला हद्दपार करण्यासाठी मदत करा असेदेखील म्हटले आहे.
दरम्यान मुंबई शहरामध्ये कोरोनाचे देशातील सर्वाधिक रूग्ण आहेत. वरळी, धारावी सारखे भाग कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणी अधिक रूग्ण समोर येत आहेत. मुंबईने काल 3600 रूग्णांचा टप्पा ओलांडला आहे. तर महाराष्ट्र राज्यात 5 हजारांपेक्षाही अधिक रूग्ण आहेत. धारावी मध्येच रूग्णांचा 200 चा ट्प्पा केल्याने आता नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान काल केंद्रील पथक आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या या भागातील आढाव्यामध्ये धारावीतील झोपडपट्टी आणि राहणीमान पाहता येथे होम क्वारंटीन शास्त्रीय पद्धतीने होऊ शकत नसल्याने आता या भागातील नागरिकांचे तातडीने नजीकच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थात्मक क्वारंटीन होणार आहे. प्रत्येकाचे संरक्षण करणे आणि मृत्यू दर शून्यावर आणणे, हे आमचे उद्दीष्ट आहे- आरोग्यमंत्री राजेश टोपे.
ANI Tweet
In view of #COVID19, Municipal corporation of Greater Mumbai has authorised all Deans & Medical Superintendents of various hospitals to extend contract period of all their employees whose contracts are expiring in near future: Brihanmumbai Mahanagar Palika #Maharashtra
— ANI (@ANI) April 23, 2020
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉक डाऊन आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात नागरिकांना घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केले आहे.