Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात कोण बणू शकतं 'कोविड योद्धा'? कसा कराल संपर्क, काय आहेत अटी?
उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकारशी संपर्क करता यावा, यासाठी एक ईमेल आयडीही या वेळी सांगितला. जाणून घ्या कोविड योद्धा होण्यासाठी आवश्यक अटी. कसा कराल सरकारला संपर्क.
Covid Yoddha Email ID: कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढा आता अधिक व्यापक झाला आहे. या व्यापक लढ्यात वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या मात्र अता सेवानिवृत्त असलेल्या नागरिकांनाही सामावून घेतले जाणार आहे. अशी सेवा देणाऱ्या नागरिकांना 'कोविड योद्धा' (Covid Yoddha) म्हणून ओळखले जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना सरकारशी संपर्क करता यावा, यासाठी एक ईमेल आयडीही या वेळी सांगितला. जाणून घ्या कोविड योद्धा होण्यासाठी आवश्यक अटी. कसा कराल सरकारला संपर्क.
कोविड योद्धा पात्रता (Covid Yoddha Qualification)
- कोविड योद्धा होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी covidyodddha@gmail.com या ईमेल आयडीवर सरकारशी संपर्क करावा.
- सर्वसामान्य नागरिकांना कोविड योद्धा होता येणार नाही.
- कोविड योद्धा होणारी व्यक्ती ही लष्कर, सरकारी प्रशासन यंत्रणा किंवा देशभरातील सरकारमान्य संस्थेत वैद्यकीय क्षेत्रात काम करुन सेवानिवृत्त झालेली किंवा प्रशिक्षीत असावी.
- वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा कोविड योद्धा होण्याबाबत विचार केला जाणार नाही.
- कोविड योद्धा होण्यासाठी कोणावरही सक्ती नाही. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.
- कोविड योद्धा व्यक्तिसाठी पद, मानधन, अथवा वेतन याबाबत अद्याप कोणतीही निश्चिती नाही. (मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्याबाबत उल्लेख केला नाही.)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट निवारण, अनुभव, सूचना, तक्रारी अथवा इतर कारणांसाठी कोणत्याही नागरिकांनी या ईमेलवर संपर्क करु नये. हा ईमेल आयडी केवळ कोविड योद्धा होण्यासाठी संपर्क करु इच्छिणाऱ्या व्यक्तिसाठीच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे इतर मंडळींनी या इमेल आयडीवर संपर्क करुन हा ईमेल आयडी ब्लॉक करु नये, असे अवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2020 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

