Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) एका व्यक्तीने न विचारता पाणीपुरी मागवल्याने पत्नीजवळ (Wife) भांडण (conflict) झाले. वाद इतका वाढला की पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी पतीविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक्षा सरवदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती गहिनीनाथ सरवदे यांना पोलिसांनी सध्या अटक केली आहे.  पुण्यातील प्रतीक्षा सरवदेंच पतीसोबत रात्रीच्या जेवणावरून वाद झाला. त्यांनंतर तिने आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक्षा सरवदे यांच्या पतीने  शुक्रवारी पाणीपुरी आणली होती. मात्र प्रतीक्षा सरवदे यांनी संपुर्ण जेवण केल्या असल्याने त्यांनी याबाबत पतीजवळ विचारणा केली. यावरून वाद झाला. त्यानंतर जेवण न करता हे जोडपे झोपले. दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा सरवदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

पत्नीला शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी तिच्यावर उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. प्रतीक्षा सरवदेचा 1 फेब्रुवारी 2019 रोजी गहिनीनाथ अंबादास सरवदे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक 18 महिन्यांचा मुलगा आहे. सुरुवातीला आरोपी सोलापुरात राहायचा पण नंतर पुण्यात राहायला गेला. सोलापुरात दांपत्यामध्ये सतत वाद होत असत. कारण महिलेला सरवदेला पुण्यात नोकरी मिळावी आणि तिथं राहावं असं वाटत होतं.

हे जोडपे पुण्यात गेल्यानंतर वाद संपले नाहीतच. पाणीपूरी आणल्याच्या प्रश्नावर  गहिनीनाथ समाधानकारक उत्तर देत नव्हते. दोघांमधील वाद वाढला. प्रतीक्षा पाणीपुरी खाण्यास नकार दिला. यानंतर प्रतीक्षाने ऑफिसला जाताना गहिनीनाथला टिफिन बॉक्स देण्यासही नकार दिला. यातून प्रतीक्षाचा राग इतका वाढला की तिने विष खाल्ले. तिला रविवारी मृत घोषित करण्यात आले. जेव्हा तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. हेही वाचा Kashimira Road Rage: 18 वर्षीय तरूणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; 8 जणांना पोलिसांनी केली अटक

महिलेचे वडील प्रकाश पिसे यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे. तेव्हा ही घटना उघडकीस आली. पिसेने पोलिसांना सांगितले की, आरोपी महिलेवर अत्याचार करत होते. पिसेच्या आरोपांच्या आधारे, पोलिसांनी आरोपीवर कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, 48 (ए) घरगुती हिंसा, 232 स्वेच्छेने दुखापत करणे, 504 शांती भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे. आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.