Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज नव्याने 1,073   कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1145 रुग्णांना डिस्चार्ज
Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज नव्याने 1073 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 72 हजार 576 झाली आहे. तसेच आज 1145 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 14,621 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3 लाख 54 हजार 102 इतकी झाली आहे. आज 5 हजार 840 टेस्ट घेण्यात आल्या. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 840 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 3 लाख 54 हजार 102 इतकी झाली आहे. तसेच शहरात उपचार घेणाऱ्या 14 हजार 621 रुग्णांपैकी 760 रुग्ण गंभीर असून यातील 466 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 294 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 12,614 नवे कोरोना संक्रमित रुग्ण, तर 322 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज पुणे शहरातील 1,145 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून शहरातील एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 56 हजार 245 झाली आहे. कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत.