Manohar Joshi | (Photo Credit: File Photo)

महाराष्ट्रात (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर आले. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ स्वार्थासाठी एकत्र आले, अशी टीका विरोधीपक्षाच्या नेत्यांनी केली आहे. तसेच महाविकासआघाडीचे सरकार दिर्घकाळ टिकणार नसल्याचेही चर्चाही रंगल्या आहेत. यातच शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहन जोशी (Manohar Joshi) याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजपसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील असे विधान करुन मनोहर जोशी यांनी सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नवे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झाली नाही. तसेच खाते वाटपही झाले नाहीत, याचा नेमका अर्थ काय ? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यात मनोहर जोशींच्या वक्यव्याने अधिक भर पडली आहे. "ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही, त्यावेळी मत गोळा करण्याच्या निमित्ताने पक्ष विस्ताराच्या दृष्टीने गोष्टी घडतात. सध्या याच गोष्टी शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत झाले आहे. याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे नाही. योग्य वेळ येताच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे", असे मनोहर जोशी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- 'मला भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांचं आमंत्रण मिळत नाही,' एकनाथ खडसे यांचा खुलासा

एएनआयचे ट्वीट-

भाजप- शिवसेना महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती. पंरतु विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन युतीत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत हात मिळवणी करुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीदेखील मंत्रीमंडाळाच्या विस्ताराला वेळ का लागतोय? तसेच मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य खरे ठरेल का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेसमोर पडली आहेत.