Water Cut in Mumbai: मुंबईत आजपासून 30 तासांसाठी 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Water Cut in Mumbai: मुंबईत आजपासून 30 तासांसाठी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या ठिकाणी जलविद्युत स्थानकात मोठा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात अगोदरचं 15 टक्के कपात अनिश्चित कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र, आता लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी 14 मार्च पासून सकाळी 8 वाजल्यापासून ते 15 मार्च दुपारी 2 वाजेपर्यंत 30 तासांसाठी दादर, परळ, वरळी, माहिम, माटुंगा, प्रभादेवी आदी भागात 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, महालक्ष्मी, सातरस्ता, धोबीघाट या भागात 15 मार्च रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. (वाचा - संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावात- जितेंद्र आव्हाड)

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभागांत 14 मार्च रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

याशिवाय डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग या ठिकाणी 14 मार्च रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग आदी विभागांत 15 मार्च रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय धोबीघाट-सातरस्ता विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं आहावन बीएमसीच्यावतीने करण्यात आलं आहे.