Ganpati Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! रत्नागिरीमधील काजळी नदीच्या खाडीत 2 जण बुडाले; शोधकार्य सुरू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

Ganpati Visarjan: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात गणपती विसर्जनाला (Ganpati Visarjan) गालबोट लागले आहे. रत्नागिरी जवळच्या टाकळे येथील काजळी नदीच्या खाडीत गणपती विसर्जन करताना दोन जण बुडाले आहेत. हे दोघेजण अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासनाने शोधकार्य सुरू केलं आहे.

दरम्यान, सत्यवान उर्फ बाबय पिलणकर (वय 48), विशाल पिलणकर (वय 28) असं बुडून बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. रविवारी सर्वत्र दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील भाट्ये येथील टाकळे परिसरात गणपती विसर्जन काजळी खाडीमध्ये केले जाते. सायंकाळी गणपती विसर्जन मूर्ती विसर्जनासाठी किनारी भागात आणल्या जात होत्या. पाण्यात अचानक भोवरा तयार झाला. यात हे दोघेही बुडाले. (हेही वाचा - Change Name Of Sambhaji Bidi: संभाजी बिडी धुम्रपान उत्पादनाविरोधात शिवभक्त आक्रमक! बिडीचे नाव बदला अन्यथा आंदोलन छेडणार; शिवधर्म फाउंडेशनचा इशारा)

दोघांनी बुडलेलं पाहून तेथील उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत हे दोघेही पाण्यात बेपत्ता झाले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरु होता. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.