Mumbai Monsoon | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात येत्या 24 तासात मान्सून (Monsoon) अधिक सक्रिय होणार असून, पुढचे चार ते पाच दिवस ही सक्रियता अशीच कायम राहण्याची शक्यता अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी वर्तवली आहे. अनुपम कश्यपी हे पुणे येथील हवामान विभाग ( Meteorological Department (IMD) Pune) अधिकारी आहेत. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबई आणि ठाणे परिसरात अतिवृष्टाचा इसाराही कश्यपी यांनी दिला आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना कश्यपी म्हणाले की, येत्या चार ते पाच दिवसात पावसाचा जोर असाच कायम राहिली. हा जोर खास करुन उत्तर महाराष्ट्र, ठाणे आणि मुंबई शहरात कायम राहिली. इतकेच नव्हे तर, दक्षिण महाराष्ट्रातही पाऊस चांगलाच सक्रिय राहिल असेही कश्यपी यांनी सांगितले.

गोवा आणि कोकण प्रदेशात पाऊस पहिल्यापासूनच दमदार आहे. पण, येत्या काही तासांत याहीपेक्षा मुसळधार पाऊस या भागात पडण्याची शक्यता आहे. या भागात 76 टक्क्यांपेक्षाही अधिक पाऊस पडण्याची शक्यताही कश्यपी यांनी व्यक्त केली. तर, काही भागात 52 ते 76 टक्के पावसाची शक्यता असल्याचेही कश्यपी म्हणाले.

एएनआय ट्विट

दरम्यान, मुंबई शहरात सोमवारी संततधार पाऊस कोसळला. त्यामुळे मुंबईतील सकल भागात पाणी साचलेच. परंतु, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्तेवाहतुकीवरही झाला. मुंबई मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तर, शहरातील सस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अनेक वाहतुक मार्गांत बदल केले. तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले. (हेही वाचा, मुंबई शहरात 48 तासात सरासरी 550 मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस: महापालिका)

स्कायमेट ट्विट

उर्वरीत महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस दमदार पडला. मात्र, या पावसाने काही ठिकाणी जीवित तर काही ठिकाणी वित्त हानी केली.