औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 87 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14640 एवढी झाली आहे. त्यापैकी 10 हजार 901 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 484 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 255 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मनपा भागातील 49 तर ग्रामीण भागातील 38 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोनाची चाचणी करणारे औरंगाबाद शहर हे देशात दुसरे तर राज्यात पहिले शहर ठरले आहे. (हेही वाचा - COVID-19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; राज्यात आज 9 हजार 509 कोरोनाबाधितांची नोंद, तर 260 जणांचा मृत्यू)
जिल्ह्यातील 87 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14640 एवढी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 484 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 3255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सविस्तर: https://t.co/XY4pIV05pf pic.twitter.com/v43VdUCUqL
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) August 3, 2020
दरम्यान, औरंगाबाद शहरात इतर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. शहरात आजपर्यंत प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे 71 हजार 828 या दराने चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण जास्त असल्याने तेथील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी समोर येत आहे.
औरंगाबाद शहरात दुध, मटण, अंडी, भाजी, केश कर्तनालय त्याचबरोबर किराणा मालाच्या दुकादारास चाचणी सक्तीची केली गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी 9 हजार 509 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 260 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 इतकी झाली आहे.