Yavatmal (Photo Credit: ANI)

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला (National Polio Vaccination Campaign) 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली आहे. मात्र, यवतमाळमधील (Yavatmal) प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर (Sanitizer) पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान, मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले होते. सुरुवातीला मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती समोर आली. सध्या त्यांच्यावर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना उद्या सकाळी घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. हे देखील वाचा- Mumbai shocker: पाच मुल असणाऱ्या बापाने 5 वर्षीय मुलाचे कपडे काढून केले लैंगिक शोषण, सुनावली 10 वर्षांची शिक्षा

एएनआयचे ट्वीट-

हा संपूर्ण प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जात आहे. ज्यावेळी या मुलांना लस देण्यात आली, त्यावळी लसीकरणावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. मात्र, नेमकी ही चूक कोणाकडून झाली? याचा तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.