मुंबई (Mumbai ) शहरातील या हंगामातील सर्वात कमाल तापमानाची आज (29 डिसेंबर 2020) नोंद झाली आज मुंबईच्या सांताक्रूज (Santacruz) स्टेशन परिसरात तापमान 15 ° C आणि कुलाबा (Colaba) येथे 17 ° C इतके नोंदविले गेल्याचे भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे. पश्चिम गोलार्धासोबत उत्तर मैदानी प्रदेशात निर्माण झालेल्या थंड हवेच्या पोकळीमुळे मुंबई शहराच्या तापमानात (Temperature Of Mumbai City) घट झाली आहे. आयएमडी पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळिकर यांनी म्हटले आहे की, मुंबई शहराच्या तापमानात आणखीही घट होऊ शकते. आयएमडीने रविवारपासून पुढे दोन दिवस मुंबई शहरातील तापमानात घट होऊ शकते असे म्हटले आहे. रविवारीही शहातील आणि उपनगरांतील तापमान काही प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले.
या आधी या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद 23 डिसेंबरला झाली होती. या दिवशी शहरात 15.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी (डिसेंबर 2020) या हंगमातील सर्वात कमी तापमानाची नोंद 14.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आले होते. (हेही वाचा, Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे. )
13-14 degrees Celsius temperature recorded over isolated pockets of Mumbai today. The trend to continue for 24 hours with a gradual increase in temperatures thereafter: IMD
— ANI (@ANI) December 29, 2020
दरम्यान, मुंबई शहरातील हवा गेल्या काही काळात प्रचंड प्रदुषीत होत असल्याचे पुढे येत आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर प्रदुषीत असल्याचे पाहायला मिळत होते. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये त्यात सुधारणा झाली आहे. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च ने सांगितलेल्या वायू गुणवत्ता सूचकांक (AQI) नुसार शहरातील 10 ठिकाणांवर हवेच्या गुणवत्तेची माहिती घेण्यात आली. या वेळी आलेला अहवाल धक्कादायक होता. शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर ढासळली होती.