आज, 2 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2019) सुरवात झाली आहे, मुंबईत या सणाचा सोहळा आणि एकूणच उत्साह कमालीचा असतो. पण या सणावर यंदा पावसाचे सावट कायम असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यातर्फे (Indian Meterological Department) वर्तवण्यात आला आहे. यानुसार येत्या 2-3 दिवसात मुंबई व उपनगरात जोरदार पाववसाची शक्यता आहे. यंदा पावसाने जुलैचा पूर्ण महिना व ऑगस्ट चा पहिला पंधरवडा अक्षरशः थैमान घातले होते मात्र मध्यनातरी विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाट काळजीची गरज नाही असे भासत होते. मात्र 31 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने आता मुंबईकर व गणेशभक्त चिंतीत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मागील 24 तासात मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या दक्षिणेकडे किनारपट्टीजवळ वादळी वाऱ्यांची परिस्थिती निर्मण झाली आहे, तसेच ओडिशा व लगतच्या परिसरातही चक्री वादळाचे संकेत आहेत त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील काही दिवस मान्सून वारे हे पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण कोकणात सक्रिय असतील. त्यामुळे कोकण व तळ कोकणासह औरंगाबाद, अकोला, अहमदनगर, नागपूर व अन्य लगतच्या परिसरातही पावसाची चिन्हे आहेत. (गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता, लेप्टो आणि स्वाइन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना आवाहन)
दरम्यान, जुलै महिन्यात मुंबई आणि उपनगरात 1 आणि 2 जुलै मध्ये 375 मिमी पावसाची नोंद झाली. तर, 3-5 ऑगस्ट या काळात 337.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची कोसळधार पाहायला मिळाली