मुंबई शहराबरोबरच उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. यामुळे मुंबईतील सखोल भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हेतर, काही भागात वाहतूक कोंडी झाली आहे. यातच कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. परतु, श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचे कम बॅक झाले आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा येथे काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवस पावसाने दडी मारलेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. हे देखील वाचा- Mumbai Traffic Update: मुसळधार पावसानंतर मुंबईच्या दिशेने येणार्या मार्गावर वाशी परिसरात वाहतूक कोंडी
ट्वीट-
IMD predicts heavy rainfall/thundershowers at most places over Konkan, at many places over Madhya Maharashtra and at few places over Marathwada for this week. pic.twitter.com/UAsaqf2j1C
— ANI (@ANI) July 28, 2020
तसेच येत्या एक ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिमालय पर्वत रांगाजवळ द्रोणीय स्थिती निर्णाण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात 29 ते 31 जुलै दरम्यान मुळसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.