मुंबईकरांची आज दिवसाची आणि आठवड्याची सुरूवात मुसळधार पावसाने झाली आहे. दरम्यान त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकडे येणार्या दिशेच्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. वाशी परिसरात वाहनांची लांबच लांब रांग आहे. दरम्यान मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये तास दीड तास जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यानंतर आता मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतूक मात्र मंद गतीने पुढे सरकत आहे.
दरम्यान आज सकाळी हिंदमाता, सायन परिसरात पाणी साचले आहे. पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोना फैलाव आटोक्यात आला असल्याने आता हळूहळू वर्दळ सुरू करण्यास परवानगी आहे. खाजगी कार्यालयामध्ये 10% कर्मचार्यांची उपस्थिती आहे. अद्याप रेल्वे सामान्यांसाठी सुरू नसल्याने रस्ते वाहतूकीवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे मुंबईच्या अनेक ठिकाणी सध्या पिक अव्हर्स मधे वाहतूक कोंडी पहायला मिळते.
ANI Tweet
Maharashtra: Traffic congestion seen in Vashi area of Navi Mumbai, after a spell of rain. pic.twitter.com/AqAs778Bce
— ANI (@ANI) July 27, 2020
मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार, सकाळी बरसून गेलेल्या मुसळधार पावसानंतर पुढे दिवसभर त्याचा जोर ओसरत जाणार आहे.