मुंबई, ठाणे येथे पावसाला सुरुवात, पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2019 (Photo Credits: IANS)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील महाराष्ट्रातील विविध राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून अधिक वाढला आहे. तर राज्यातील सखल भागात पावसाचे पाणी साचून पुरस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. तर आज पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचसोबत विजा सुद्धा कडाडत आहेत. तसेच पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

तर उद्या (19 सप्टेंबर) मुंबई, ठाणे येथे पावसाचा जोर अधिक वाढणार असून सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर पुढील चार तासात रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबई येथे समुद्रसपाटीपासून 40 KMPH ने जोरदार वारे वाहणार आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर, आणि रायगड, या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच या चारही जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारपर्यंत मुसळधार पाऊस असण्याची शक्यता आहे.(Mumbai Rain Record: मुंबईतील पावसाने मोडला 65 वर्षातला विक्रम, आतापर्यंत झाली 3453 मिमी पावसाची नोंद)

मुसळधार पावसामुळे नागरिकांनी काम असल्यास घराबाहेर पडावे असे ही आवाहन करण्यात आले आहे. तसेच कल्याण भागात विजा कडाडणार असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.या वर्षीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन सतत विस्कळीत होत आहे. याआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.