Image used for Representational Purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये मागील आठवड्याभरापासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा दमदार हजेरी लावत आहे. मागील काही तासांपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे. 23 जुलैच्या रात्रीपासून कोसळणार्‍या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी तुंबायला सुरूवात झाली आहे. कालपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मात्र अधूनमधून दमदार हजेरी लावत असल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज ( 25 जुलै) दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक या भागात पुढील चार तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाची अधून मधून बरसात होत आहे. त्याचा परिणाम रस्स्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर दिसून येत आहे. मुंबईत रेल्वे धीम्या गतीने सुरू आहे. कोकाणातही पावसाचा जोर असल्याने अनेक ठिकाणी धोका वाढला आहे. स्कायमेट तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, कोकण आणि गोवा परिसरात 28 जुलै पर्यंत जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदाही मुंबईकरांना 26 जुलैला अतिवृष्टीचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ANI Tweet

मुंबईमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका आणि आपत्ती नियंट्रण विभाग सज्ज आहे. पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावे याकरिता खास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबईत हिंदमाता,सायन यासारख्या साखल भागात पाणी साचते.