भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) उद्या, 25 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Pune Red Alert) जारी केला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. खराब हवामानामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयापासून स्वारगेटपर्यंतच्या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Pune Visit) 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुण्याला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कात्रजपर्यंत हा मार्ग वाढवण्याची पायाभरणी करतील आणि पिंपरी-चिंचवाड ते निगडीपर्यंतच्या एलिवेटेड कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करतील. या पार्श्वभूमीवर पुण्याचे हवामान आणि नैसर्गिक स्थितीस महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुण्याचे उद्याचे हवामान कसे राहील?
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्याचे हवामान कसे असेल, पावसाची स्थिती कशी राहील याबाबतही आयएमडीने हवामान अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह कोसळण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान आणि संबंधित कार्यक्रमांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी हवामानाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्रातील हवामान: राज्यात परतीचा पाऊस? कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अधिक जोर, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी)
महाराष्ट्रात मान्सूनच्या पुनरागमनाला विलंब होण्याची शक्यता
नैऋत्य मोसमी पावसाचा माघारीचा काळ ऑक्टोबरपूर्वी सुरू होण्याची शक्यता नसल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून कायम राहण्याची शक्यता आहे. येथील हवामान आणि अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, महाराष्ट्रात ऑक्टोबरपूर्वी मान्सून माघार घेण्याची शक्यता नाही आणि मध्य भारतातून नैऋत्य मान्सूनच्या माघारीला विलंब होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा या भागावर परिणाम होत असल्याने अधिकाऱ्यांनी रहिवाशांना प्रतिकूल हवामानाच्या या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा, Pune Dam Storage Update: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराजवळील धरणे भरली, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज, नागरिकांना नदीपात्र न उतरण्याचा सल्ला)
राज्यात पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
24 Sep, Heavy rainfall alerts for Maharashtra during next 4,5 days by IMD.
Pl keep watch on alerts by IMD pic.twitter.com/ATAJ1RZsqk
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2024
दरम्यान, पंतप्रधान कार्यालालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. ते सायंकाळी 6 च्या सुमारास, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन येथून, ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट, पुणे येथे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर संध्याकाळी 6:30 च्या सुमारास ते उद्घाटन करतील, पायाभरणी करतील आणि 22,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्राला समर्पित करतील. याशिाय ते इतरही कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता या कार्यक्रमांवर अनिश्चिततेचे ढग जमवत आहे. त्यामुळे पुणेकर आणि महाराष्ट्राचेही लक्ष उद्याचे हवामान कसे असेल याकडे लागले आहे.