Jitendra Awhad and Mhada (Photo Credits: PTI and FB)

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार प्रयत्नात असते. तसेच आपले स्वप्नातले घर पूर्ण होण्यासाठी माणूसही रात्रं-दिवस कष्ट करुन पैसे कमवतो. अनेकांनी मोठ्या इमारतीत राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आवडत्या प्रोजेट्समध्ये पैसेही गुंतवले. मात्र 'मुंबई, ठाण्यातील म्हाडा कॉलनीमध्ये (Mhada Colony) एक-एक इमारतीचा विकास करण्यासाठी म्हणून विकासकाने तिथल्या रहिवाशांबरोबर समझोता करार केला आहे. पण, अनेक वर्षे या इमारतींचा विकास न-करता तसेच रहिवाशांना भाडे न-देता मुजोर पणाची वागणूक हे विकासक करीत आहेत' असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या लक्षात येताच त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

"यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकासकाने इमारतीचे काम रोखून ठेवले, तर म्हाडा ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल" अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा, लोकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

जितेंद्र आव्हाडांची ही घोषणा घर खरेदी करणा-यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे चालढकल करणा-या मुजोर विकासकांना चांगलाच रोख बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच विकासकांनी ही गोष्ट लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी. इमारत लवकरात लवकर बांधून देऊ असे सांगून वर्षानुवर्षे ते प्रोजेक्ट लटकवून ठेवणा-या विकासकांना नक्कीच चांगला चोप बसणार आहे.