Amravati Coronavirus Guidelines: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्या प्रशासनाने काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी अमरावती जिल्ह्यात 498 नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 26 हजार 726 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार, लग्नसोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला 50 हजार दंड तसेच वधू- वर पक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास याची शिक्षा म्हणून वाहतुकदाराला 5 हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानांना 10 हजार दंड ठोठावण्यात येणार असून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे. (वाचा - Jayant Patil Tests Corona Positive: महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण)
#lokmat dt 17-02-2021#coronavirus pic.twitter.com/FXhvCtOiKS
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI (@InfoDivAmravati) February 17, 2021
दरम्यान, जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ यापुढे रात्री 10 वाजेपर्यंतचं मर्यादित असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच 10 दिवस हॉटेलला सील करण्यात येणार आहे.