Sanjay Raut (Photo Credit: ANI)

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुशांत सिह राजपूतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासावर नाराजी व्यक्त करत याप्रकरणी बिहार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आयपीएस अधिकारी बिनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. यावरून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा, असे  संजय राऊत म्हणाले आहेत.

नुकताच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता संजय राऊत म्हणाले की, सुशांत सिंह प्रकरणाचा मुंबई पोलीस आधीपासूनच चौकशी करत आहेत. तर, महाराष्ट्र सरकार तसेच याप्रकरणाशी संबंधित नाही, यावर टीक करणे योग्य नाही, कारण या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Sushant Singh Rajput Case: बिहारमधून मुंबईत दाखल झालेले पटणा सुपरीटेंडंट बिनय तिवारी यांच्या गृह अलगीकरणावर BMC चे स्पष्टीकरण

एएनआयचे ट्वीट-

तसेच राम मंदिराच्या भूमीपूजनावरूनही संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रणाची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच राम मंदीर उभे राहत आहे, याचा शिवसेना आनंदच आहे. याशिवाय राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षाने 1 कोटीचा निधी दिल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत