Maratha Reservation: 'माझ्या जीवितास काही झाले तर, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील' मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकीलांचा इशारा
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने लढा दिला होता. आज आरक्षणाच्या निर्णय बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कायदेशीररित्या असा निर्णय घेता येणार नाही, असे स्पष्ट करत मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने पेट घेतला असून सर्वच स्तरावर निषेध नोंदवला जात आहे. यातच मराठा आरक्षणाला विरोध करणारे जयश्री (Jayshree Patil) आणि गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आम्हाला धमकीचा फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आमच्या जीवितास काही झाले तर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्य घटनेच्या कलम 14 च्याविरोधात आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मान्य केले. मराठा समजाला देण्यात आलेले आरक्षण कादेशीररित्या टिकणारे नव्हते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच अश्लिल शिवीगाळ देखील केली जात आहे, असे जयश्री म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Maratha Reservation: 'महाविकास आघाडीला याची जबर किंमत मोजावी लागेल' मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर समरजितसिंह घाटगे यांचा राज्य सरकारला इशारा

"सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर सगळे आदेश रद्द झाले आहेत. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन आता तहसिलदार, फौजदार होता येणार नाही. एसटी, एससी, ओबीसी यांना त्याचा लाभ होणार नाही. हा 52 मोर्चाचा स्पष्ट पराभव आहे. मोर्चे काढून, मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून आरक्षण मिळत नसते. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आरक्षण मिळते," असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे. यापुढे ते म्हणाले की, "माझ्या जिवितास काही झाले तर, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मराठा संघटना जबाबदार असणार आहेत."

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे काय घोषणा करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.