महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक वेगाने पसरत चालले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊनच्या काही निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. तरीदेखील बेरोजगारीसारख्या प्रश्नांनी डोके वर काढली आहे. एवढेच नव्हेतर, अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीकारांनाही (Ganesh Idol Makers)आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना पुण्यातील एका मूर्तीकाराने आपली व्यथा लोकांसमोर मांडली आहे. गणेशोत्सवाला जेमतेम दिवस उरले असताना अद्याप एकाही मूर्तीची बुकींग न झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही या उत्सवावर अवलंबून आहोत. मात्र, कोरोनाच्या भितीपोटी लोक घराबाहेर पडण्यास टाळत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. परिणामी अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द किंवा निर्बंधांखाली साजरी करावी लागली आहेत. तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार गणेशोत्सव यंदा शांततेत पार पाडला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे यावर्षी राज्य शासनाने चार फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मुर्तिकार आधिक अडचणीत आले आहेत. तर, दुसरीकडे गणेश मूर्तीची मागणीतही घट झाल्याने मूर्तीकारांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे देखील वाचा-Ganesh Utsav 2020: 'यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होणार' श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा निर्णय

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात गणेशमूर्ती तयार केल्या जातात. मात्र, कोल्हापूर, पेणे, सातारा, ठाणे, बीड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, या जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय चालतो.