![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/02/Untitled-design-2021-02-06T191002.551-380x214.jpg)
Maharashtra: पती-पत्नीमध्ये सहसा भांडणं होत असतात. कधीकधी हे भांडण इतक्या विकोपाला जातात की, त्याच निराकरण करण्यासाठी त्यांना पोलिस स्टेशन किंवा न्यायालयात जावे लागतं. परंतु, आपण नवरा-बायकोला अंड्यावरून भांडण करताना किंवा पोलिस स्टेशनमध्ये जाताना ऐकलं आहे का? तुम्ही अशाप्रकारचे प्रकरणं क्वचितचं ऐकले असतील. अशीच एक घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा गावातून समोर आली आहे. जिथे पती-पत्नीमध्ये तीन अंड्यांवरून हाणामारी झाली आणि हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले.
पती-पत्नीमध्ये तीन अंड्यांवरून भांडण झाल्याचं ऐकल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला. पतीने बाजारातून 3 अंडी आणली होती. पतीने आपल्या पत्नीला या अंड्यांची भुर्जी बनवण्यास सांगितलं. पत्नीने बनवलेली भुर्जी मुलीने खाल्ली. त्यानंतर पती बाहेरून आला. त्यावेळी त्याला अंडा भुर्जी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. हा वाद पुढे जास्त वाढला. (वाचा - वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर)
पोलिस अधिकारी जितेंद्र अडोळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला बाजारात तीन अंडी आणण्यासाठी बाजारात पाठवले आणि ही अंडी या दोघा पती-पत्नीला दिली. पोलिस अधिकाऱ्याने या महिलेला आपल्या पतीला घरी जाऊन अंडा भुर्जी बनवण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती हा रोजंदारीवर काम करतो आणि अत्यंत कमी पैशात घराचा संपूर्ण खर्च सांभाळतो.