Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र सेकेंडरी स्कुल सर्टिफिकेट परिक्षा (SSC) अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. तर सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेच्या अभ्यासाचे वातावरण दिसून येत आहे.  मात्र विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता मनापासून अभ्यास करण्याचे आवाहन दिले जाते. तसेच पालकांनाही याबाबत समज दिली जाते. शालेय शिक्षकही विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यास बहुतांश मदत करताना दिसून येतात. त्याचसोबच महाराष्ट्र बोर्ड परिक्षेच्या संकेतस्थळावर परिक्षेचे वेळापत्रक mahahsscboard.maharashtra.gov.in येथे जाहीर करण्यात आले आहे. तत्पूर्वी तुम्ही आमच्या संकेतस्थळावरुन PDF डाऊनलोड करुन दहावीच्या परिक्षेचे वेळापत्रक पाहू शकणार आहात.

बोर्ड परिक्षांनी दहावीच्या परिक्षा येत्या 1 मार्च 2019 पासून सुरु होणार असून 22 मार्च पर्यंत असणार असल्याचे जाहीर केले आहे. (येथे दहावीच्या परिक्षेची PDF डाऊनलोड करा) तसेच बारावीच्या कॉमर्स शाखेची परिक्षा दहावीच्या बोर्ड परिक्षेपूर्वी सुरु होणार आहे. तर येत्या 21 फेब्रुवारी पासून एचएससी (HSC) बोर्ड परिक्षा सुरु होणार आहे. मात्र यंदाच्या दहावी बोर्ड परिक्षेची पद्धत बदलण्यात आली आहे.

तर महाराष्ट्रीतील पुणे,मुंबई,औरंगाबाद,नाशिक,नागपूर, कोल्हापूर,अमरावती,लातूर आणि रत्नागिरी अशा नऊ बोर्ड परिक्षा केंद्रावर एसएससी आणि एचएससी परिक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका असा सल्ला पालकांना मुलांच्या परिक्षांपूर्वी दिला जातो.