परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी ठाकरे सरकारचा मदतीचा हात; 'इथे' ऑनलाईन माहिती देण्याचंं आवाहन!
Flights| Photo Credits: ANI

महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आता देशात लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदीचे नियम लागू असतील. याकाळात वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने देशात आणि परदेशात अडकलेल्या अनेक नागरिकांना पुन्हा आपलं घर कसं गाठावं हा प्रश्न पडला आहे. मात्र आता हळुहळु राज्यात अडकलेले मजुर, पर्यटक, विद्यार्थी यांना घरी सुखरूप पोहचवण्यासाठी रेल्वे, बसची सोय करण्यात येत आहे. तसेच आता परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सोयीसाठीदेखील सरकार पुढे आले आहे. प्रवासी विमानसेवा थांबवण्यात आल्याने आता अनेकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग  बंद झाला आहे. पण महाराष्ट्र सरकारने आता परदेशात अडकलेल्या महराष्ट्रीयन लोकांना दिलासा दिला आहे. एका ऑनलाईन फॉर्ममध्ये परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना आपली माहिती भरून द्यायची आहे. ही माहिती महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला दिली जाणार आहे. त्यानुसार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान 7 मे पासून केंद्र सरकार परदेशात अडकलेल्यांसाठी विशेष विमानसेवा देखील सुरू करणार आहे.

आज महाराष्ट्र सरकार कार्यालयाच्या अधिकृत  ट्वीटर हॅन्डलवरून एक फॉर्म शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती ते व्हिसा डिटेल्स देणंं गरजेचे आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला देऊन निर्बंध शिथील झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी सुटका करण्यासाठी वापरली जाणार आहे. ही माहिती महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकार आणि संबंधित विभागांना दिली जाणार आहे. दरम्यान आज देण्यात माहितीनुसार, 64  विशेष विमानांपैकी युएई मध्ये 10, कतार मध्ये 2 सौदी अरेबिया मध्ये 5, युके मध्ये 7, सिंगापूरमध्ये 5,  अमेरिकेमध्ये 7, फिलिपाईंसमध्ये 5, बांग्लादेशमध्ये 7, बहरिनमध्ये 2, मलेशियामध्ये 7, कुवेतमध्ये 5,ओमानमध्ये 2 विशेष विमानं भारतीयांच्या सुटकेसाठी पाठवली जाणार आहेत.

CMO Maharashtra ट्वीट 

मुंबई मध्ये येणारी नजिकच्या काळातली विमानं कोणती? 

7 मे पासून  आबुधाबी ते कोच्ची आणि दुबई ते काझीकोडे अशी खास विमानसेवा दक्षिण भारतामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी झेपावणार आहेत. टप्प्या टप्प्याने परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ही विमानसेवा असेल. दरम्यान यामध्ये अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणार आहे. परदेशात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकायला जातात. सद्यस्थिती पाहता अनेकांना आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. त्यांच्यासाठी आता सरकार प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांसोबत तात्पपुरते कामासाठी, वैद्यकीय  उपचारांसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांची संंख्यादेखील मोठी आहे. त्यांना आता हा मोठा दिलासा असेल.